Silent Star

SOUL
2016-10-07 11:51:12 (UTC)

रागवायचे नाही चिडायचे नाही सगळे गिळायचे..

रागवायचे नाही चिडायचे नाही सगळे गिळायचे म्हणजे आयुष्य कसं गुळगुळीत होतं
आयुष्य कधी कुठे रस्ता बदलेल कुणालाच माहित नसतं... तरी आपण बिनधास्त पने सगळे चालतो.. बेह्धडक..
प्रत्येक व्यक्ती आपण जायच्याशी भेटतो बोलतो, नाही बोले तरी त्या प्रत्येक व्यक्तीचे स्थान आपल्या आयुष्यात कोरलं जातं .. मंग जे आपले आहेत ज्यांच्या सोबत आपण स्वतःहून जुळतो .. तेच का आपल्याला कळत नाहीत..
एका वर एक चेहरे असलेले आपलेच जवळची नाती अनोळखी वाटतात
राग आला तरी शांत होणे सर्वांना जमत नाही
सतत सगळे ठीक होतील या आशेने राग दूर करून .. प्रयत्न केला तरी माणसाच्या वृत्ती सर्व जाळून टाकते
अश्या रीतीने आयुष्य चालत असतं एक मेकांच्या रागाच्या ओढाताणीत ..
ज्याने राग गिळला .. तोच खरा आयुष्य चा मानकरी असतो .. कारण त्यालाच आनंद प्रपात होतो




Ad: