2012-08-21 10:23:47 ( UTC )
स्वार व्हा, मनातल्या वादळांवर! thought
स्वार व्हा, मनातल्या वादळांवर!
स्वार व्हा, मनातल्या वादळांवर!
कोणतंही वादळ कायम राहत नाही.
एक वादळ येतं, ते निघून जातं,
त्यानंतर दुसरं येतं आणि थैमान
घालू लागतं,
तेही निघून जातं, असं एकामागून एक
घडत असतं.
जीवन ढवळून टाकणारं वादळ जसं शांत
होतं जातं, तसं तुम्हाला एका
वेगळ्याच अनुभूतीची जाणीव होऊ
लागते. आत्मिक शांततेचा अनुभव येऊ
लागतो, मनच नव्हे तर शरीरही हलकं
हलकं झाल्याचं जाणवू लागतं...
......... वादळं नेहमीच उठत असतात.
जेव्हा ती घोंघावत येतात, त्यावेळी
सर्व हादरून टाकलं जातं, परिसर
उद्ध्वस्त केला जातो. जशी बाहेरची
वादळं, तशीच मनातही वादळं उठत
असतात, त्यामुळं तुमच्यावर
उद्ध्वस्त होण्याचा प्रसंग ओढवतो.
तुमचं मन अनेकदा दोन वादळांच्या
आवर्तात सापडत असतं. अशावेळी
तुम्हाला द्वंद्वच खेळावं लागतं.
तुमच्या अंतरंगात अशी वादळं किती
वेळा उठतात, त्यावर तुम्ही जीवनात
किती स्थिरावलेले आहेत, हे ठरत
असतं. ज्यावेळी तुमच्या मनात वादळ
घोंघावू लागतं त्यावेळी तुमचा
श्वास जड झालेला असतो. शरीर थरथरत
असतं. मन काबूत राहात नसतं. तुमचा
तोल ढळलेला असतो. अशा वादळातून
तुम्हाला सुटका करता येते काय? हा
सर्व जगभर सतावणारा मूलभूत
प्रश्ान् आहे. या प्रश्ानचं उत्तर
'होय' असं आहे. त्यासाठी प्रथम एक
गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्या
मनात वादळ निर्माण होत आहे, याची
जाणीव करून घ्या आणि त्या वादळाला
तोंड द्यायला सज्ज व्हा. वादळात
सापडू नका. समुदाला लाटा येतात आणि
नंतर त्या पाण्यातच विरतात. तसंच,
मनातील वादळाचही असतं. ते येतं तसंच
परत निघूनही जातं. कोणतंही वादळ
कायम राहत नाही. एक वादळ येतं, ते
निघून जातं, त्यानंतर दुसरं येतं
आणि थैमान घालू लागतं, ते ही निघून
जातं, असं एकामागून एक घडत असतं.
जीवन ढवळून टाकणारं वादळ जसं शांत
होतं जातं, तसं तुम्हाला एका
वेगळ्याच अनुभूतीची जाणीव होऊ
लागते. आत्मिक शांततेचा अनुभव येऊ
लागतो, मनचं नव्हे तर शरीरही हलकं
हलकं झाल्याचं जाणवू लागतं.
ज्यावेळी आत्मिक शांतता तुम्ही
अनुभवू लागता, त्यावेळी तुमच्या
मनातील सर्व प्रकारच्या चिंता,
भीती निघून गेलेली असते. अशावेळी
तुम्ही केवळ तुम्हीच असता. मनातील
वादळ तुमचं जीवन उद्ध्वस्त करू
शकतं, परंतु, ते शमविण्याचा साधा
उपाय आहे, तो मी तुम्हाला सांगतो.
असं वादळ निर्माण झालं तर तुम्ही
त्याचा दोन्ही हातानं स्वीकार करा,
त्याच्याशी झगडण्याचं सोडून द्या,
असं केलं तर ते आपोआप शांत होत जातं.
आध्यात्म्याची शिकवण आचरणात
आणण्यामागे, साधना वा ध्यानधारणा
करण्यामागं हाच हेतू असतो.
ज्यावेळी तुम्हाला जाणीव होते की,
माझी कोणीतरी काळजी करीत आहे,
त्यावेळी तुम्ही निर्धास्त बनता,
तुमची सर्व चिंता, असुरक्षितता कमी
होते, निघून जाते. बऱ्याचवेळा
तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीपासून
पळण्याचा प्रयत्न करता. तुमच्या
भावना, इच्छा, संवेदना यामुळे
तुम्ही अस्वस्थ होता. जसा
लाटांशिवाय समुद नसतो, तसंच
वादळाशिवाय जीवन नसतं. वादळ हे
जीवनाचा भाग असतो. प्रत्येक वादळ
तुमच्या जीवनात बदल घडवू पाहत असतं.
ते तुम्हाला अधिक मजबूत बनवू पाहत
असतं. आवड-नावडीच्या फेऱ्यातून
तुम्हाला ते बाहेर खेचतं आणि तुमचं
मन शांत आणि शुद्धही करतं. म्हणूनच
जीवनातील वादळांना न घाबरता, त्यास
दोन्ही हातानं सामोरं जा. असं करणं
म्हणजे तुम्हाला वाटेल की,
वादळापुढे तुमचा बळी देण्यात येत
आहे, परंतु ते तसं नाही. जीवनातील
वादळाला सामोरे न जाता, त्याच्याशी
झगडण्याचा प्रयत्न कराल, तर त्याचे
परिणाम वाईट असतील, त्यामुळे इतर
वादळांना आमंत्रण दिल्यासारखं
होईल. खरं म्हणजे, तुमचं जीवन सर्व
प्रकारच्या लाटांपासून वरचढ असतं.
ते तुम्हाला उद्ध्वस्त करू शकत
नाही. त्यामुळे या वादळी लाटांना न
घाबरता, त्यांना अंगावर घ्या.
त्यांना त्यांचं तांडवनृत्य करू
द्या, तुम्ही शांत रहा, विचलित होऊ
नका. ही जाणीव होणं खूप महत्त्वाचं
आहे. परंतु जेव्हा तुम्हाला ती
जाणीव होते, त्यावेळी तुम्ही
सर्वांपेक्षा वेगळे होता आणि
जीवनाची वाटचाल खोल महासागरातही
यशस्वीपणे करीत राहता. या सर्व
गोष्टींची जाणीव असणं म्हणजे
तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाची
परिणती. जगातील प्रत्येकाला
जीवनातील पेचप्रसंग, असुरक्षितता,
गोंधळ यांना तोंड द्यावंच लागतं.
जीवनाच्या समुदात अशा गटांगळ्या
खाव्याच लागतात. 'लाइफ जॅकेट'
घातलेला माणूस समुदातील तुफानास
तोंड देऊ शकतो, त्याच प्रमाणं
ज्ञानाचं 'लाइफ जॅकेट' तुमच्याकडे
सज्ज असणं आवश्यक आहे. 'तुम्ही
मरण्यापूवीर् मरा' असं सांगितलं
जातं. त्याचा वेगळा अर्थ आहे.
तुमच्या जीवनाच्या महासागरात अनेक
लाटा येतात आणि त्या पाण्यात
सामावून घेतल्या जातात. तुम्ही या
लाटा पाहता, त्या म्हणजे तुम्ही
स्वत:च असता. टीव्हीवर कुस्त्यांचा
फड पाहत असाल, तर कल्पना करा दोन्ही
कुस्तीगीर किंवा मल्ल हे तुम्हीच
आहात. जीवनात तुम्ही अशा अनेक
भूमिका पार पाडत असता. कधीकधी तर
तुम्ही पूर्ण विरोधी भूमिकेतही
असता. या प्रत्येक भूमिकेत तुम्हास
मिळालेलं नाव आणि स्वरूप हा
सदसद्विवेकबुद्धीचा भाग असतो. अशा
प्रकारे जीवनात वेगवेगळ्या भूमिका
तुम्हा एकट्यालाच पार पाडायच्या
असल्यानं आयुष्यातील वादळाला तोंड
देताना पळून जाण्याची घाई करू नका.
या वादळासोबत रहा. तुम्ही शांत
राहिलात तर तुमच्या आसपासही
शांतता राहील. तुम्ही पूर्णतेचा
ध्यास धरला तर तुमच्यात
अपूर्णतेची निमिर्ती होईल. या
विश्वाच्या केंदस्थानी तुम्ही
आहात. जेथे जेथे तुम्ही जाता, तेथे
तेथे तुम्ही तुमचं मन घेऊन जाता आणि
जेथे जेथे जाता, तेथे तेथे स्वत:चं
वादळही घेऊन जाता. कधी कधी ते शांत
झाल्याचं जाणवत असतं, परंतु, अचानक
ते पुन्हा उसळतं. याची तुम्हास
जाणीव झाली तर तुम्ही या वादळात बळी
पडणार नाही. अशा या मनातील वादळांवर
कायमचा तोडगा नसतो. म्हणूनच मी
तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, अशा
वादळांना न घाबरता, तुमच्या
व्यक्तिमत्त्वाशी त्यास खेळू
द्या. (अनुवाद: जॉन कोलासो)
आपला विवाह झाला का? प्रश्नकर्ता
नाही म्हणतो.
मग संतोष कामेरकर म्हणतात..
‘आपल्याकडे विवाहानंतर पत्नीचे
नवे नाव ठेवण्याची प्रथा आहे.
तेव्हा आपण करोड.. हे नाव ठेवा
म्हणजे आपण इन्स्टन्ट ‘करोडपती’
होऊन जातो.’
View printer friendly version